Bhosri : महिलेचा विनयभंग करत धमकीचे पत्र गाडीच्या सीटवर चाकूने खोचले; एकास अटक

एमपीसी न्यूज –  महिलेच्या दुकानात येऊन तसेच तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकीचे पत्र लिहून ते पत्र महिलेच्या दुचाकीच्या सीटवर चाकूने खोचून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 22 मे ते 6 जून या कालावधीत एमआयडीसी भोसरी (Bhosri)  पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Mahalunge : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पकडला दहा किलो गांजा

सुभाष जयराम पोखरकर (वय 52, रा. स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने एमआयडीसी भोसरी (Bhosri)  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे केक शॉप आहे. त्यांच्या दुकानात येऊन आरोपीने फिर्यादिसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी त्यांच्या सोसायटीच्या बाहेर आल्या असता त्यांना रात्यात अडवून त्यांच्याकडे प्रेमाची मागणी करून गैरवर्तन करत पुन्हा विनयभंग केला. फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेल्या त्यांच्या दुचाकीच्या सीटवर आरोपीने धमकीचे पत्र लिहिले ते पत्र दुचाकीच्या सीटवर चाकूने खुपसून ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.