Hinjawadi Rape Case: लग्नाच्या आमिषाने गोवा, महाबळेश्वर येथे नेऊन महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने महिलेला गोवा, महाबळेश्वर आणि हिंजवडी येथे नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. महिलेकडून लाखो रुपये घेऊन ते पैसे परत न करता तिची आर्थिक फसवणूक केली. तसेच तिच्या होणा-या पतीला याबाबत सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार सन 2018 ते सन 2021 या कालावधीत घडला.

युवराज आनंदराव पाटील (वय 27, रा. रेंदाळ, हातकणंगले, जि. कोल्हापुर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोल्हापूर मधील शिरोळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिथून हा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीला बागा बीच गोवा येथील लॉजवर ट्रॅव्हल्सने घेऊन जात तसेच एक्सर्बिया हिंजवडी येथे फ्लॅटवर एकत्र राहून आणि महाबळेश्वर येथे स्वतःच्या कारमधून घेऊन जात तिथल्या लॉजवर आरोपीने फिर्यादीवर बलात्कार (Rape) केला.

Police Constable : ऐकावे ते नवलच! चक्क ‘या’ कारणासाठी पोलीस हवालदाराने वरिष्ठांकडे मागितली सुट्टी

आरोपीने त्याच्या कंपनीत प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगून सरकारी नोकरीसाठी पैसे पाहिजे असे कारण देत फिर्यादीकडून 11 लाख 65 हजार 657 रुपये घेतले. फिर्यादीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्यातील एक लाख 59 हजार रुपये आरोपीने परत केले, अन्य पैशांची मागणी केली असता आरोपीने फिर्यादींसोबत केलेल्या कृत्याची माहिती तिच्या होणा-या नवऱ्याला सांगून तिचे जमलेले लग्न मोडण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.