Pune Crime News : वारजेत इस्टेट एजंटकडून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : भाड्याचे घर मिळवून देताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका इस्टेट एजंटने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप विशाल ठोकळ (वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला ही परिचारिका म्हणून काम करते. तर आरोपी हा इस्टेट एजंट आहे. दोन वर्षापूर्वी फिर्यादी महिलेला भाड्याने घर पाहिजे होते. म्हणून ती आरोपीच्या वारजे येथील रियल इस्टेटच्या कार्यालयात गेली होती. त्यातून झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने तिला लग्नाची मागणी घालत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपीची पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर त्याने फिर्यादीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली परंतु फिर्यादी ने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिला घरात डांबून ठेवत लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने हा सर्व प्रकार एका मैत्रिणीला फोनवर सांगितला त्यानंतर मैत्रिणीने पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वारजे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.