Bhosari : हॉटेलवर जेवायला नेण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – महिलेला हॉटेलवर जेवणासाठी जाऊ असे सांगत तिला जबरदस्तीने लॉजवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी भोसरी येथे घडली.

अविनाश पथकुंडे (वय 24, रा. धावडेवस्ती भोसरी), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश आणि फिर्यादी महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीचा फायदा घेऊन 11 फेब्रुवारी रोजी दुपारी आरोपी अविनाश याने फिर्यादी महिलेला गाडीवर बसून जेवण करून  येऊ असा बहाणा केला. त्यातून अविनाश याने महिलेला भोसरी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.