Pimpri : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संत तुकारामनगर पिंपरी येथे घडली.

सौरभ प्रकाश यादव (वय 27, रा. शुक्‍ला कंपाऊंड, भीमनगर, बोईसर, जि. पालघर), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी ही मैत्रिणीसोबत पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात भाड्याने राहते. 9 ऑगस्ट 2015 रोजी मैत्रिण नसताना आरोपी सौरभ हा पीडित तरुणीच्या रूमवर आला. तू माझी पत्नी झाली आहे. मला तुझ्याशी शरीर संबंध ठेवायचे आहे, असे म्हणत तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ‘ओरडले तर बदनामी होईल’, अशी भीती पीडित तरुणीला वाटली. त्यानंतर वेळोवेळी आरोपीने पीडित तरुणीला आपण लग्न करू, असे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.