Nigdi : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – दुकान खरेदी करण्यासाठी माहेराहून सहा लाख रूपये आणण्याकरिता सासरच्या मंडळींकडून होणा-या छळाला कंटाळून विवाहितेने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी निगडीतील संजयनगर येथे घडली.

सुरक्षा अमोल म्हस्के (वय 23) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती अमोल दत्तू मस्के (वय 26), सासरा दत्तू रामा मस्के (वय 62), सासू केसरबाई दत्तू मस्के (वय 55, सर्व रा. संजयनगर, ओटास्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा हीचे वडील लक्ष्मण नामदेव थोरात (वय 47, रा. भोरी भडक, दौंड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरक्षा आणि अमोलचा 2016 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपींनी सुरक्षाला माहेराहून दुकान घेण्यासाठी सहा लाख रूपये आणण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून सुरक्षाने गुरूवारी घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.