Theur : नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेली महिला दोन मुलींसह गेली वाहून

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्या दोन मुली वाहून गेल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली. आज सोमवारी (दि.3) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

चंद्रकला राजू भूल (30, रा. थेऊर), भजन भरतसिंह भूल (22) आणि सोनिया राजू भूल (4) अशी पाण्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला भूल या कपडे धुण्यासाठी थेऊर येथील नदीपात्रात गेल्या होत्या. काही वेळात चंद्रकला, भजन आणि सोनिया हे पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली. स्थानिकांनी ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.