Bhosari : पीएमपीएमएल बसची पादचारी महिलेला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने धडक दिली. या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 19) भोसरीतील गव्हाणेवस्ती येथे घडला.

लक्ष्मण अशोक मुंडे (वय 28, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बसचालक भरत तुकाराम इंगोले (वय 32, रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई प्रदीप कांबळे (वय 28, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई गव्हाणेवस्ती येथील सावित्रीबाई फुले शाळेसमोरून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. यावरून लक्ष्मण यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.