PMPML : पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज –  पिंपरी ते चिंचवड स्टेशन चौक या (PMPML) दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना अज्ञातांनी प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी दुपारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते चिंचवड स्टेशन चौक या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होत्या.

Pune : पुण्यात होणाऱ्या बागेश्वर महाराजांच्या दरबाराला अंनिसचा विरोध; कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बस प्रवासात (PMPML) अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कापून चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.