Nigdi : पीएमपी बस मधून महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 24 मे रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास निगडीतील (Nigdi) मधुकर पवळे बीआरटी बस स्टॉप येथे घडली.

Pimpri : हेंन्कल कंपनी तर्फे सेवा कार्य दिवस

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 24 मे रोजी दुपारी पीएमपी बसमधून प्रवास करीत होत्या. त्या मधुकर पवळे ब्रिज खाली बीआरटी बस स्टॉप येथे बसमधून उतरत असताना त्यांच्या हातातील 56 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी (Nigdi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.