Talegaon MIDC Crime News : अज्ञात व्यक्तींनी चोरले महिलेचे सोन्याचे गंठण

एमपीसी न्यूज –  दोन अज्ञात इसमाने 22 जून रोजी एका महिलेचे सोन्याचे गंठण चोरून नेले आहे. पीडित महिलेने तळेगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यात दिली आहे. दोन अज्ञात इसमानविरोधात भा. द. वि कलम 392 व 34 अंतर्गत दाखल करण्यात आली आहे.

Vijay Bhosale : आचार्य प्र. के. अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना जाहीर

फिर्यादी महिला लग्न समारंभ संपवून 22 जूनला रात्री 8.30 वा वारले ते तळेगाव स्टेशनकडे जाणाऱ्या डांबरी रोडशेजारी इंद्रायणी मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या फाट्यावर रिक्षाची वाट पाहत होत्या. त्यावेळी एक काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकल वरून दोन इसम आले त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याच्या तारेतील गंठण अंदाजे एक तोळे वजनाचे 40,000 रुपये किमतीचे हिसका मारून जबरी चोरी करून नेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.