Chinchwad : तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्याबद्दल ‘विमेन हेल्पलाईन’ तर्फे जल्लोष

एमपीसी न्यूज – संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तिहेरी तलाक विरोध विधेयक मंजूर झाल्याबद्दल ‘विमेन हेल्पलाईन’ या महिला आत्याचार विरोधी समितीने मुस्लीम महिलांसोबत केक कापून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. अतिशय चांगला निर्णय महिलांच्या बाजूने झाल्याने आज मुस्लीम महिला खूप आनंदात होत्या. वर्षेनुवर्षं चालत आलेल्या अन्यायकारक प्रथेला कुठेतरी चाप लावून पायाबंद घातल्याबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी संस्थेच्या नीता परदेशी उपाधक्षा शैलजा गुरव, मीना मोहिते, जयश्री प्रसाद, नीता चामले, सुलताना शेख, जरीना शेख, रेश्मा शेख, आशा कसबे आलिया शेख, शबाना इमानदार, शमा शेख, वहिदा अत्तार, नदाम रुक्साना इनामदार आदी महिला उपस्थित होत्या.

शैलजा गुरव यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. नीता चामले यांनी आभारप्रदर्शन केले. नीता परदेशी यांनी कार्यकमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.