Women abuse : महिलेवर अत्याचार करत धमकी

एमपीसी न्यूज : महिलेवर अत्याचार करून तिला पोलीसात तक्रार करण्यास मज्जाव करत तिला जिवे मारून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. हा प्रकार 2017 पासून सुरु होता.(Women abuse) 31 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्र शेषेराव शिंदे (वय 42 रा.पुनावळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Alandi garbage issue : आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 सालापासून आरोपी याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. मात्र लग्न नकरता फसवणूक केली.(Women abuse) यावेळी फिर्यादी या पोलीस ठाण्यात जाणार हे समजताच आरोपीने फिर्यादीला पोलीस जाऊन तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली.त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिली असता चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

 

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.