Wakad Crime News : स्वीगी डिलिव्हरी बॉयचे तरुणीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी भावासोबत घरी जात असलेल्या एका तरुणीला डिलिव्हरी बॉयने मिठी मारली आणि तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री पावणे बाराच्या सुमारास सम्राट चौक, वाकड येथे घडली.

पीडित तरुणीने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी स्वीगी डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नेपाळ येथील आहे. तिचा भाऊ आणि ती तरुणी चायनीज विकण्याचा गाडा चालवतात. रविवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दोघे भाऊ बहीण चालत घरी जात होते. रात्री उशीर झाल्याने कुत्रे भुंकत असल्याने पीडित तरुणाचा भाऊ कुत्र्यांना हकलण्यासाठी पुढे चालत होता.

दरम्यान, स्वीगी डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून तिथे आला आणि तरुणीला मिठी मारून त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.