Pune : करवा चौथ सण पुणे कॅम्प येथील महिलांनी केला उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – अश्विन पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी साजरा होणाऱ्या करवा चौथ सण पुणे कॅम्प येथील महिलांनी उत्साहात साजरा केला. यावेळी पारंपरिक पेहरावात साजशृंगार व त्या निमित्ताने  एकत्र जमलेल्या मैत्रिणी नातलगांसह हा सण साजरा केला. या करवा चौथ सणाचा आनंद लुटला.

यावेळी प्रीती सहानी, अनिता जोहर, विना कोच्चर, लीना कलसी आदी महिला सहभागी झाल्या होत्या. करवा चौथच्या दिवशी महिला भगिनी दिवसभर उपवास करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी हा उपवास केला जातो. रात्री चंद्र दर्शन झाल्यावर उपवास सोडला जातो, अशी माहिती प्रीती सहानी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.