PCMC : महापालिकेतर्फे बुधवारी महिला जागरूकता प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सक्षमीकरण किंवा जागरूकतेसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पावसाळ्यात महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

PCMC : महापालिका उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधणार

याच समस्या टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने महिला जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कामगार कल्याण विभागाच्या वतीने बुधवार दि. २८ जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात करण्यात आले आहे.

महिला जागरूकता कार्यक्रमात कर्मचारी महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांचे निवारण, सध्याच्या मॉर्डन जीवनशैलीमुळे त्वचा व शरीरावर होणारे घातक दुष्परिणाम या विषयावर पुण्यातील आरोग्य सल्लागार सोनल राहुल गांधी आणि त्यांच्या सदस्यांच्या मार्फत सुयोग्य मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.