Nigdi News : स्वउन्नतीसाठी प्रभावमुक्त व प्रकाशयुक्त जीवन महत्वाचे – स्वामी श्रीकंठानंदजी

एमपीसी न्यूज – आज प्रत्येकाचे जीवन हे बाहेरील परिस्थितीच्या प्रभावातून जगतानाचे चित्र आपण पाहतो. मनोरंजन करणाऱ्यांना जीवनाचे आदर्श मानू लागलो आणि आपले जीवन अंधारमय होऊ लागले. आपण प्रत्येकाने स्वत:लाच प्रश्न विचारला पाहिजे की, (Nigdi News) खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाशाचा उपयोग आपल्याला कसा होईल व आपण प्रकाशयुक्त होऊ, असे प्रतिपादन स्वामी श्रीकंठानंदनी यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा अंतर्गत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ तसेच महिला भजनी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त , ‘यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
अनेक उदाहरणांचे दाखले देत, भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्टीत, कशी स्वयंप्रकाशीत करते याचे विवेचन केले. त्यासाठी त्यांनी संतांची, ऋषींची व भारतीय मंत्रांची उदाहरणे दिली. आपण या प्रकाशात वाटचाल केली तर आपल्या जीवनातही उत्कर्ष होईल याबद्दल खात्री दिली. प्रश्नोत्तराच्या वेळेत विद्यार्थ्यांनी स्वामीजीशी संवाद साधला व त्याला स्वामीजींनी समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली. विवेकानंदांच्या उत्तीष्ठ, जागृत भारताचे उदाहरण दिले, अशा उदाहरणांमुळे विद्यार्थी अत्यंत प्रभावीत झालेले दिसून आले.
Pimpri News : राज्यात “माता रमाई जयंती उत्सव” साजरा होण्याकरिता आदेश निर्गमित करण्याची मागणी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक पवन शर्मा, पुष्पराज वाघ यांचे सहकार्य लाभले. संस्कृति संवर्धन व महासंघाचे अध्यक्ष हभप किसन महाराज चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
शिवानंद चौगुले, चंद्रशेखर जोशी, विकास देशपांडे, रमेश टेकाडे, गिरीश देशमुख तसेच स्वा.सावरकर मंडळाचे, राजीव देशपांडे, राजेंद्र त्रंबके, भास्कर रिकामे, व पतंजली योग (Nigdi News) समितीचे संतोष देशपांडे, प्रिया देशपांडे, विजया माने आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. प्रा. पुष्कराज वाघ यांनी सूत्रसंचालन केले. तर, उज्वलाताई केळकर यांनी आभार मानले.