Pune Fraud Case : अशी ही बनवाबनवी! “हे सामान बांधून ठेवा, फक्त तेलाच्या पाच पिशव्या द्या”, महिलेने दुकानदाराला फसवले

एमपीसी न्यूज – पुण्यातील चंदन नगर परिसरात एका किराणा दुकानदाराला महिलेने चांगलेच (Pune Fraud Case)  फसवले. दुकानात आलेल्या एका अनोळखी महिलेने किराणा सामानाची भलीमोठी यादी दिली. हे सर्व सामान बांधून ठेवण्यासाठी सांगितले. दुसऱ्या दिवशी येऊन पैसे देते आणि सामान घेऊन जाते असा विश्वासही तिने दुकान मालकाला दिला. जाताना मात्र तेलाच्या पाच पिशव्या घेऊन ही महिला निघून गेली ती परत आलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित दुकान मालकाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. चंदन नगर पोलिस ठाण्यात शेवटी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान मालक पिराजी बाजीराव डफळ (वय 58) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे खराडी परिसरात साई ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. 23 जुनच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी महिला दुकानात आली. तिने मुलाचा वाढदिवस असल्याचे सांगून किराणा सामानाची एक भली मोठी यादी फिर्यादीना दिली. हे सर्व सामान बांधून ठेवा उद्या येते आणि पैसे देऊन घेऊन जाते असे फिर्यादीला सांगितले. जाताना मात्र ही महिला पाच जेमिनी तेलाची पाकिटे घेऊन गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही महिला आलीच नाही. शेवटी वाट पाहून फिर्यादीला आपली फसवणूक (Pune Fraud Case)  झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन तक्रार दिली.

Pune Leopard Fear : पुण्यातील कात्रज परिसरात दोन बिबट्यांचा वावर, पाळीव श्वान केले फस्त

दरम्यान या महिलेने चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच ते सहा दुकानात जाऊन अशा प्रकारे फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत या महिलेने वेगवेगळ्या दुकानातून तीस तेलाच्या पिशव्या घेऊन जात फसवणूक केली आहे. मागील चार ते पाच दिवसात हा सर्व प्रकार घडला. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.