Bhosari : टेम्पोच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

फिर्यादीनुसार टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव टेम्पोने धडक दिल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भोसरी परिसरात घडली. या प्रकरणी गुरुवारी (दि.17) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मायादेवी केशवराव मधोळकर (वय 58, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्वभारती विक्रम शिंदे (वय 44, रा.विठ्ठलनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पोचालक राऊत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मधोळकर या रविवारी (दि. 13) रात्री साडे नऊच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील एस ब्लॉक परिसरातून पायी जात होत्या. दरम्यान, पाठीमागून आलेल्या राऊत याच्या ताब्यातील भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मधोळकर यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.