Pune Crime News : सासरच्या छळाला कंटाळून शीतलने राहत्या घरातच जीवन संपवले

एमपीसी न्यूज – कागल पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका 28 वर्षीय विवाहित महिलेने माहेरून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी संबंधित विवाहितेचा पती, सासू सासरे, नणंद, चुलत सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल विपुल नेवसे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती विपुल नेवसे, सासु पुष्पा, सासरा विलास, चुलत सासरा कैलास, चुलत सासू जयश्री, ननंद योगिता रासकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2014 मध्ये शितलचे विपुल नेवसे याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षाचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर काही दिवसातच विपुल शीतलला मारहाण करायला लागला. माहेरून पैसे घेऊन यावेत यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ देखील होत असे. सासरच्या या छळाला कंटाळून शीतलने राहत्या घरात गळफास आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.