Bhosari News : महिला लघुउद्योजकांच्या वस्तू प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भोसरी आणि इंद्रायनीनगर परिसरातील महिला लघुउद्योजकांसाठी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित केलेल्या वस्तू ,खाद्यपदार्थ ,आणि रोजच्या वापरातील इतर वस्तूचे प्रदर्शन व विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये पिंपरी – चिंचवड तसेच पुणे शहरातील महिला उद्योजकांनी सहभाग घेतला होता.

इंद्रायनीनगर परिसरात समता मित्र मंडळ येथे तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन प्रख्यात लेखिका मंजू काइरा, माऊंट एव्हरेस्ट शाळेच्या मुख्याध्यापक स्नेहल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

17,18,19 ऑक्टोबर हे 3 दिवस महिलांनी स्टॉल्स उभारले होते. यासाठी महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती. समारोपाच्या दिवशी ब्रेन अकॅडमीच्या रेशु आगरवाल, पत्रकार अश्विनी भोगाडे, मॅक्स वूमनच्या प्रियदर्शनी हिंगे ,वाकी गावाच्या उपसरपंच योगीता जाधव, डॉ.लीना बोरुडे उपस्थित होत्या.

दरम्यान, संस्थेच्या पदाधिकारी शोभा आरुडे, पुष्पलता शेवाळे, सुनीता हुंबरे, मीना जगदाळे, जयश्री काळे, ऍड.नीतू रामचंदानी, सीमा लिंभोरे, अंजली हलगे यांची सुद्धा उपस्थिती होती.

या कार्यक्रमप्रसंगी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या तेजस्विनी लोकरे यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. संस्थेच्या संस्थापिका राजश्री गागरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.