Pune : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नकोच ; अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या अधिवेशनात ठराव मंजूर 

एमपीसी न्यूज – शबरीमाला मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश देता कामा नये, असा ठराव एकमताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात मंजूर करण्यात आला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

“अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात पाच ठराव करण्यात आले. त्यामध्ये राम मंदिर प्रश्न सामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारावे. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये. ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याआधी संरक्षण द्यावे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन त्यांच्या मूळ गावी करण्यात यावे, आणि आरक्षणाचे योग्य ते पुनर्मूल्यांकन केलं जावं अशाप्रकारचे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत.” असे यावेळी गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.