Pimpri Crime News : ओएलएक्स वरील फ्रिज खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्स वरील फ्रिज खरेदी करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने क्युआर कोड स्कॅन करण्यास लावून महिलेची 48 हजार 997 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री पिंपरी येथे घडली.

9900974269 व 9394911568 मोबाईल फोन धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. 29) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ओएलएक्सवर त्यांच्या घरातील फ्रिज विक्रीसाठी जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून एका अज्ञात व्यक्तीने 9900974269 व 9394911568 या क्रमांकावरून फिर्यादी महिलेशी संपर्क केला. फ्रिज खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेच्या फोनवर सहा वेळा क्यूआर कोड पाठवला. क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून महिलेची 48 हजार 997 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.