Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा!

400 हून अधिक महिला मल्ल सहभागी होणार

एमपीसी न्यूज : पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत मानाची गदा जिंकली. याच पार्श्वभूमीवर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या (Women Maharashtra Kesari) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी राज्यातील महिला कुस्तीपटू मैदानात घाम गाळत आहेत. या स्पर्धेत राज्यभरातून 400 हून अधिक महिला मल्ल सहभागी होणार आहेत.

 

सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होत आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील मल्ल सहभागी होणार आहेत.(Women Maharashtra Kesari) महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.

 

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला; शिवसेनेचे आमदार-खासदारही जाणार

 

बेणापूर (ता. खानापूर) व बेडग ता. (मिरज) कुस्ती केंद्रातील 40 बाय 40 आकाराचे दोन मॅट स्पर्धेसाठी मागवले आहेत. क्रीडा संकुलात पश्चिमेकडील गॅलरीत शौकिनांची बसण्याची व्यवस्था आहे. राज्यभरातील 30 मान्यवर पंच नियुक्त केले आहेत

 

महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकणाऱ्या महिला पहिलवानाची इतिहासात नोंद होणार आहे. कारण या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

 

महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली, तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. (Women Maharashtra Kesari) 1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीने देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.