Women molestation : महिलेला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत तिला धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Women molestation) हा प्रकार 7 सप्टेंबर रोजी देहुरोड येथे दुपारी एक च्या सुमारास घडला होता.

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ईश्वर दरेकर (वय 34 रा. पुरंदर) व 52 वर्षीय महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan crime : रिक्षा चालकांकडून टपरी चालकाला हप्त्याची मागणी करत मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी या देहुरोड येथील मैत्रिणीच्या घरी वाढदिवसासाठी आल्या होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी सर्वांसमोर फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानीत केले. तसेच फिर्यादी यांचा व्यवसाय बंद करण्याची व लग्न न होऊ देण्याची धमकी दिली.(Women molestation) उपस्थितांसमोर च अश्लिल हातवारे करत फिर्यादी यांचा विनयभंग केला. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.