Women molestation : जुन्या भांडणाच्या रागातून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज  :  जुन्या भांडणाच्या रागातून वराळे गाव येथे महिलेला शिवीगाळ करत तिचे कपडे फाडून विनयभंग करण्यात आला आहे.(Women molestation) ही घटना शुक्रवारी (दि.23) वराळे गाव येथे घडली.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विश्वनाथ शिंदे (वय 32 रा. वराळे) व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Visapur Fort : विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलगा दरीत पडून जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाच्या जुन्या वादातून अनोळखी इसम यांनी फिर्यादीला कोणतीही कल्पना नसताना कपडे व हात पकडून भांडणास सुरुवात केली.(Women molestation) तसेच दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.