Women molestation : जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Women molestation) हा प्रकार मंगळवारी (दि.25) पिंपरीतील मिलींदनगर येथे घडला आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून गुणवंत शिवलिंग बुलबुले (वय 54) दोन महिला आरोपी दिनेश गोरख वडतिले (वय 25), केशव गोरख वडतिले (वय 22) सर्व राहणार काळेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Corporation Election : नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीसोबत महिला आरोपीचे भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपीच्या सांगण्यावरून गुणवंत याने फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीचा हात पकडून भांडणाचा जाब विचारला व गैरवर्तन केले. तसेच इतर आरोपींनीही फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला (Women molestation) जीवे मारण्याची धमकी दिली. व हाताने मारहाण केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हाा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.