Pune Crime : अंडा भुर्जीची गाडी चालवण्यासाठी महिलेकडे दहा हजार रुपये हप्त्याची मागणी

एमपीसी न्यूज : अंडा भुर्जी ची गाडी चालू ठेवण्यासाठी महिन्याला दहा हजार रुपये हप्त्याची मागणी करून महिलेला शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी (Pune Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीतील बस स्टॉप जवळ ही घटना घडली. अशोक चव्हाण (वय 45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षे महिलेने फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांचे पती म्हाडा कॉलनीतील बस स्टॉपजवळ अंडा भुर्जीची हातगाडी लावून व्यवसाय करतात. ही हातगाडी सुरू ठेवण्यासाठी आरोपी अशोक चव्हाण याने फिर्यादी आणि त्यांच्या पतीकडे दरमहा दहा हजार रुपये हप्त्याची मागणी केली.

Maharashtra MLC Election Results : शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या मतमोजमीला सुरुवात

फिर्यादी यांनी हप्ता देण्यास नकार दिल्याने आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण केली. त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करीत पतीला मारून (Pune Crime) टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.