Bhosari News : पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेचा सलग आठ महिने पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तणूक केली व महिलने त्याला विरोध केला असता महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.(Bhosari News) यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भोसरी येथे घडला आहे.

 

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संदीप दत्तात्रय मुळुक (वय 44 रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : अपयशी ठरलेल्या भाजप नेत्यांकडून मुद्दे भरकटविण्याचा प्रयत्न – अजित गव्हाणे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादीचा पाठलाग करत आहे. त्याने फिर्यादीकडे शरीरसुखाची मागणी केली. (Bhosari News) त्याला फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने अश्लिल शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.