Women-N-Power: ‘भावना’मधून उलगडणार उद्योगक्षेत्रातील महिलांचे भाव ‘विश्व’ 

एमपीसी न्यूज – ‘इंडियन इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ यांच्या ‘वुमन-एन-पॉवर’ (Women-N-Power) या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमाचा यंदा पहिला वर्धापनदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने ‘भावना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महिला उद्योजिका, महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अशा विषयांवर ऑनलाईन चर्चासत्र होणार आहेत. 

ही सर्व चर्चासत्र शनिवारी म्हणजेच उद्या (दि.20 ऑगस्ट) दुपारी अडीच ते साडेचारच्या दरम्यान होणार आहेत. यामध्ये ‘बॅटरी वूमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. राशी गुप्ता या ‘नव्याने उदयाला येणाऱ्या एनर्जी स्टोरेज टेक्नोलॉजी’बद्दल भरभरून गप्पा मारणार आहेत. तर, डॉ. देवसेना देसाई या ‘कार्यालयात एकमेकींना प्रोत्साहित करणे’, याबद्दल बोलणार आहेत. तर, योगी मुकेश अचार्य ‘मजामस्तीसह रुटीनमध्ये आपले आरोग्य कसे सांभाळावे’, याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
तर, How to do The Disappearing Act? या विषयावर ग्रीनटेक बायो प्रोडक्टच्या कविता राजन या संवाद साधणार आहेत. तसेच, फीस्ट ऑन सोलार बिस्कीटस हा देखील संडे ग्रीडससह फन प्रोग्राम होणार आहे. वुमन-एन-पॉवर (Women-N-Power) हे खास करून असे तयार केलेले नेटवर्क आहे; ज्यामध्ये उद्योग जगतात काम करणाऱ्या स्त्रियांना-उद्योजिकांना सहकार्य व मार्गदर्शन केले जाते. या नेटवर्कचे हे यंदाचे पहिले वर्ष असून पहिला वर्धापन दिन उद्या साजरा केला जाणार आहे. यामध्ये सर्वांना सहभागी होता येणार आहे.
त्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZzZsYaWCPwZD2HlD97DFVTjUvS20HuTiCNcqTADZIQclkDA/viewform या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.