Women sexual aasualt : लैंगिक अत्याचार करत महिलेची तब्बल 66 लाखांची फसवणूक कऱणारे गजाआड

एमपीसी न्यूज : लैंगिक अत्याचार करत महिलेला जबरदस्ती जमीनीचा व्यवहार करायला लावून तिची 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे.(Women sexual aasualt) हा प्रकार 10 जुलै 2021 ते 6 जून 2022 या कालावधीत घडला.

प्रदिप फक्कड कोळी (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) व देवा विलास सोनावणे (वय 32 रा. वडगाव मावळ) अशी अटक आरोपींची नावे असून अंकुश सोनावणे य़ाच्या विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.29) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी कोळी याने पवनानगर येथील जमीन चांगली आहे ती तुझी एफडी मोडून घे, तसेच तुझ्यात माझ्यात जे झाले ते कोणाला सांगू नको,नाही तर तुला व तुझ्या मुलीला पुढे-मागे कोणी नाही एकेदिवशी गायब करेन अशी धमकी दिली.(Women sexual aasualt) त्यावरून जानेवारी 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यात फिर्यादी या अंकुष सोनावणे याच्या घरी गेल्या व त्यांना विचारले की मला एक जमीन दाखवली व दिली दुसरी असे का, तर हे सारे व्यवहार कोळी बघत असल्याचे सांगीतले.

Chakan gang arrested : पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांकडून अटक

या कारणावरून कोळी सतत फिर्यादीच्या घरी येऊ लागला. त्याने फिर्यादीला लग्नाची मागणी घालून जबरदस्ती शारीरिकसंबंध प्रस्थापीत केले.(Women sexual aasualt) दरम्यान जमिनीच्या व्यवहाराचा बहाणा करून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सुमारे 66 लाख रुपये उकळले व फिर्यादी यांना जमिन न देता त्यांची फसवणूक केली. शारीरिक अत्याचार व आर्थिक फसवणूक यामुळे फिर्यादी यांना धक्का बसला होता. त्यातून मानसीक स्थिती सावरल्यानंतर त्यांनी गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.