Bhosari : भोसरीत महिलेने ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरले

एमपीसी न्यूज – ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या एका महिलेने दागिने पाहत असताना हात चलाखीने दागिने पळवले. (Bhosari) ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास लांडेवाडी रोड भोसरी येथील भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स या दुकानात घडली.

या प्रकरणी 21 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्राहक बनून आलेल्या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : उच्चशिक्षण सहसंचालक डाॅ किरणकुमार बोंदर यांची इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स या दुकानात काम करतात. शनिवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास दोन महिला दुकानात ग्राहक बनून आल्या. (Bhosari) त्या महिलांनी कानातील टॉप्स बघण्याच्या बहाण्याने ते हातात घेतले. एकूण सहा टॉप्स हातात घेऊन पाहत असताना एका महिलेने 66 हजार रुपये किमतीचा एक जोडी कानातील टॉप्स हाताच्या अंगठ्या खाली लपवून फिर्यादी यांना कळू न देता फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.