Pimpri :  डेक्कन होंडाच्या पिंपरी शाखेमध्ये महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – डेक्कन होंडाच्या पिंपरी येथील शाखेमध्ये महिला दिन आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शोरूममध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेमध्ये रीना साळवे यांना प्रथम पारितोषिक मिळाले तसेच द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे अमृता गवळी आणि धनश्री नांगरे यांना मिळाले. तसेच मेहंदी स्पर्धेमध्ये धनश्री नांगरे यांना प्रथम पारितोषिक, डिंकी मायारामानी यांना द्वितीय पारितोषिक तर तृतीय पारितोषिक स्नेहल रेथवडे यांना मिळाले. समृद्धी सुर्वे आणि प्रिया पोरे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

होंडा कार्स इंडिया लिमिटेड एरिया सेल्स मॅनेजर शरत श्रीवास्तव सर्वांना संबोधित करताना म्हणाले, महिला आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी दोन्ही आघाड्यांवर लढताना देखील कामात तितक्याच तत्पर आणि जबाबदारीने आपले कर्तव्यपालन करतात. महिलांच्या अंगी असणाऱ्या जिद्द, चिकाटी आणि सहनशक्ती या जोरावर हे शक्य होतं आणि क्वचितच कुणी पुरुष कर्मचारी या दोन्ही कसोट्यांवर खरे उतरतात.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी डेक्कन होंडाच्या जाई शिंदे, प्रियांका दिघवा आणि मनोज शिंदे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.