Pune News : शारदा महिला संघाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ,बारामती संचलित शारदा महिला संघाच्या वतीने शारदाबाई पवार शैक्षणिक संकुलामध्ये सामाजिक क्षेत्रात असामान्य (Pune News) कार्य करणाऱ्या महिलांचा संस्थेच्या वतीने आज (सोमवारी) शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात हा शारदा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी महिलांचा संस्थेच्या वतीने;शारदा सन्मान पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमास बारामती,इंदापूर, पुरंदर,दौड,फलटण सोलापूर नांदेड नाशिक पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणाहून 850 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात ढोल पथकाच्या गजरामध्ये मान्यवर व सत्कारमूर्ती महिला यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक संस्थेच्या विश्वस्त आदरणीय सुनंदा पवार यांनी केले.(Pune News) दीपप्रज्वलन संस्थेच्या विश्वस्त आदरणीय सुनंदा पवार, सविता होरा यांच्या हस्ते झाले.

Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा स्पष्ट नकार

राजश्री जाधव वाखारी चौफुला, करुणा नवलकर मालाड, नंदाताई भुजबळ शिक्रापूर, शिरूर, लता तायडे किवळे,विजयालक्ष्मी शिवणगावकर बाणेर पुणे, सविता कुंभार, सोनाली पाटणकर मुंबई,राजश्री राजगुरू निमगाव केतकी, रेणुका कड, शारदा कुंजीर उरुळी कांचन,  शिल्पा शेटे खारघर मुंबई, सुनीता नागरे अंधेरी पूर्व मुंबई, तपस्वी गोंधळी अलिबाग, डॉ.अनुष्का शिंदे नारायणगाव, मनीषा राऊत बुलढाणा, परवीन पठाण निरावागज,.चांगुना पाथरकर खांडज बारामती, कल्याणी शिंदे नाशिक, श्रद्धा ढवन ढोरमले, कमल वाघेला शारदानगर बारामती यांचा सत्कार करण्यात आला.

मनीषा राऊत यांनी महिलांनी आपली संसारवेल सावरत शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच तरुणांसाठी मेडिटेशन आणि अध्यात्म या गोष्टी गरजेच्या आहेत,असे मत व्यक्त केले. (Pune News) सोनाली पाटणकर यांनी सायबर गुन्हे याबाबत महिलांनी सतर्क असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

सत्कारमूर्तींना दिल्या जाणाऱ्या सन्मान पत्राचे वाचन संध्या सातपुते यांनी केले. सत्कारमूर्तींचा सन्मान सोहळा संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते शारदा सन्मानपत्र देऊन करण्यात आला. शारदा महिला संघ कर्ज वाटप आढावा नागरे यांनी मांडला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते व वर्षा पटणे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार गार्गी दत्ता यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.