Pane News : महिलांचे पैसे हडपले ! महिला बचत गटाची अध्यक्ष अटकेत 

एमपीसी न्यूज : सेविंगच्या नावाखाली 48 महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या महिला बचत गटाच्या दोन महिलांना पौड पोलिसांनी अटक केली. मागील तीन वर्षांपासून महिला बचत गटात बचत करण्याच्या नावाखाली ही फसवणूक सुरू होती.

मुळशी तालुक्यातील मालेगावातील हा प्रकार आहे. पौड पोलिसांनी या प्रकरणी सविता भोलेनाथ घाग (वय 43) आणि स्वाती शिवाजी कदम (वय 35) या दोन महिलांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, माले येथील काही महिलांनी एकत्र येऊन तीन वर्षापूर्वी सियाराम या नावाने महिला बचत गट सुरू केला होता. त्यात कविता घाग अध्यक्ष तर स्वाती कदम या सचिव होत्या. या दोघींनी बचत गटातील 48 महिलांकडून दरमहा एक हजार रुपये गोळा केले होते. या महिलांकडून गोळा केलेले लाखो रुपये त्यांनी बँक खात्यात न ठेवता स्वतःकडेच ठेवले होते.

बचत गटातील इतर महिलांनी या दोघींना वारंवार बँकेत खाते उघडण्यासाठी सांगत होते. परंतु त्यांनी शेवटपर्यंत खाते उघडले नाही। मागील तीन वर्षात 48 महिलांचे 16 लाख 56 हजार रुपये जमा झाले. अखेर बचत गटातील इतर महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटकही केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.