Work From Home : ‘वीज नसेल तर रजा घ्या’ आयटी कंपन्यांचा कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा

Work From Home: 'Take leave if there is no electricity' New order of IT companies for employees आयटी कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येत आहे

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसापासून रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकडच्या काही भागांत वीजेचा लपंडाव सुरू आहे. याचा फटका आयटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. घरी ‘वीज नसेल तर रजा घ्या आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा’ असा फतवा आयटी कंपन्यांनी काढला आहे.

सध्या आयटी क्षेत्रातील सर्वच कंपनीचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. हिंजवडी, ताथवडे येथील आयटी कंपनीत काम करणारे बरेच कर्मचारी रहाटणी, पिंपळे सौदागर, ताथवडे आणि वाकडच्या काही भागांत राहतात. पण मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा सारखा खंडित होत असल्यामुळे या कर्मचार्यांना काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. आयटी कंपनीने आता या सगळ्या प्रकरणावर अजब तोडगा काढत कर्मचार्यांना ‘वीज नसेल तर रजा घ्या आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा’ अशी सूचना केली आहे.

सारखा विस्कळीत होणार्या वीज पुरवठ्याबाबत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना  विचारणा केली असता समाधान कारक उत्तर मिळत नसल्याचे आयटी कामगार सांगतात. अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरु झाले आहे. मात्र, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्यांना देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आयटी क्षेत्रातील कर्मचारी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.