Pune Metro News : खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक बदल

एमपीसी न्यूज – खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्याकडून पिंपरीच्या दिशेला येणा-या मार्गावर कोणताही बदल करण्यात आला नसून पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणा-या मार्गावर बदल करण्यात आले आहेत. हे बदल आज (शुक्रवार, दि. 4) पासून प्रायोगिक तत्वावर होणार आहेत.

हॅरिस ब्रिज सीएफव्हीडी ग्राउंडदरम्यान खडकी मेट्रो स्टेशनचे काम करण्यात येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या मार्गात प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात येणार असल्याचे खडकी वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

दुचाकी, कार, रिक्षा, टेम्पो आणि अन्य हलक्या वाहनांसाठी बोपोडी चौक ते पुणे या दरम्यान वाहतुकीस बंदी आहे. खडकी रेल्वे स्टेशन समोरील स्टार हॉटेल समोरून वळण घेऊन महात्मा गांधी रोड वरून खडकी बाजार गणपती मंदिरापर्यंत जावे लागेल. तिथून उजवीकडे वळून एमएसईबी ऑफिस किंवा बिजनेस सेंटरवरून  सीएफव्हीडी सर्कल समोरून महामार्गावरील समाधान चौक किंवा चर्च चौक येथून जावे लागेल.

पीएमपीएमएल बस, एस ती बस, ट्रक यांसारखी अवजड वाहने जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील चर्च चौक येथून जाता येईल. पुणे ते मुंबई या मार्गावर प्रवास करणा-या वाहनांसाठी कोणताही बदल होणार नसल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.