BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मेट्रोच्या ओव्हरहेड ट्रॅक्शन केबलचे काम सुरू

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते दापोडी या मार्गावरील ओव्हरहेड ट्रॅक्शन केबलसाठी खांब (ट्यूबुलर पोर्टल) उभारण्याचे काम सुरु झाले आहे. एक एक टप्पा पूर्ण करत पुणे मेट्रो पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत आहे. ओव्हरहेड वायरचा खांब खराळवाडी येथील पिलर क्रमांक 327 येथे उभारण्यात आला आहे.

पुणे मेट्रोसाठी 25 हजार वोल्ट्स ट्रॅक्शन पॉवर ओव्हरहेड कॅटेनरी सिस्टम वापरली जाणार आहे. कॅटेनरी सिस्टम ट्रॅक पातळीपासून 9.1 मीटर उंचीच्या वक्र आकाराच्या खांबाद्वारे वापरली जाईल. याचे आयुष्यमान 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. एका खांबाचे वजन जवळपास 900 किलो आहे. दोन खांबांमध्ये सुमारे 35 ते 40 मीटर अंतर असणार आहे. ओव्हरहेड वायरच्या खांबासाठी व्हायाडक्टवर काँक्रीटचा पाया बनविण्यात आला आहे.

पुणे मेट्रोचा पिंपरी-चिंचवड ते दापोडी या भागात सुमारे 162 खांब (पोर्टल) उभारले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत दररोज चार ते पाच खांब सरासरी उभारले जाणार आहेत. याबरोबरच इतर कामे देखील समांतर सुरु आहेत.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ठरलेल्या वेळेत काम निश्चित केलेल्या मार्गावरील काम पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. व्हायाडक्टच्या कामानंतर ओव्हरहेड केबलचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम मेट्रोच्या कामातील मैलाचा दगड आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like