Moshi Crime News : कामावर दुसरा व्यक्ती घेतल्याने जीवे मारण्याची धमकी, आरोपी ताब्यात

एमपीसी न्यूज – कामावरून घरी गेलेल्या कामगाराला त्याच्या बदल्यात दुसरी व्यक्ती कामावर घेतल्याचे सांगण्यासाठी गेले असता कामगाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. गायकवाड वस्ती, मोशी याठिकाणी 27 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रविण सखाराम काकडे (वय 40, रा. मोशी, मुळगाव खंडाळा, सातारा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अशोक जयनारायण मंगल (वय 65, रा. चिंचवड) यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी फिर्यादी यांच्या येथे कामाला होता. आरोपी कामावरून आपल्या कुटुंबासह गावाला निघून गेला. फिर्यादी यांनी त्याच्या जागेवर दुसरा व्यक्ती कामासाठी घेणार असल्याचे सांगण्यासाठी सचिन शिंदे आरोपीच्या घरी गेला होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादी व आयुष मंगल यांना समोर आणा कोयत्याने तोडून टाकतो अशी धमकी दिली. दाखल फिर्यादीवरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.