Wakad : मिक्सर ट्रॅकचा पाईप अंगावर पडल्याने बांधकाम साईटवरील कामगाराचा मृत्यू

Worker at construction site dies after pipe of mixer track falls on him.

एमपीसी न्यूज – मिक्सर ट्रॅकचा पाईप लिफ्ट मधून वर घेत असताना लिफ्ट मधून पाईप कामगाराच्या अंगावर पडला. त्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथील स्नेहांगण बांधकाम साईटवर घडली.

मनोजकुमार सुक्कू कैफल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पंकज उर्फ नथन सुक्कू कैफल (पासवान) (वय 33, रा. सॅलीसबरी पार्क जवळ, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर दिनेश बाबूलाल सिंग (रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी वाकड येथे स्नेहांगण बांधकाम साईटवरील ए विंगचा पाचवा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. मयत मनोजकुमार त्या साईटवर कामाला होते.

मिक्सरच्या ट्रॅकचा पाईप लिफ्ट मधून वर घेत असताना मनोजकुमार मिक्सर मशीनला दगड लावण्याचे काम करत होते. लिफ्टमधून पाईप वर  घेत असताना अचानक पाईप खाली पडला.

हा पाईप मनोजकुमार यांच्या डोक्यात पडला. त्यामध्ये मनोजकुमार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवता हयगय आणि निष्काळजीपणा केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.