Pune News : मेट्रो कारशेडच्या कामादरम्यान 50 फुटावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोथरूड परिसरात मेट्रो कारशेड चे काम सुरू असताना 50 फूट उंचावरून खाली कोसळल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुळचंद्रकुमार सीताराम (वय 19, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. यासाठी कोथरूड परिसरात कारशेडची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. शनीवारी दुपारी येथील मेंटेननसच्या कामासाठी मुळचंद्र हा साधारण 50 फूट वर चढला होता. त्यावेळी त्याने अंगामध्ये सुरक्षा किट परिधान केले होते. मात्र, त्याचे हुक न अडकविल्याने तो खाली पडला. यामधे त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत कोथरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. मुळचंद्र हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून मागील तीन महिन्यांपासून तो कामासाठी पुण्यात राहत होता. त्याचा मृतदेह हा त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पाठविण्यात आला आहे. याबाबत कोथरुड पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.