Pune news: कोरेगाव पार्कमध्ये मेट्रोच्या खांबावरून खाली कोसळल्याने कामगाराचा मृत्यू

Worker dies after falling from metro pole in Koregaon Park.

एमपीसी न्यूज- मेट्रोचे काम करत असताना पिलरवरून रस्त्यावर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. शटरचे नट बोल्ट काढत असताना हा मजूर पाय घसरून खाली पडला आहे. ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (वय 23, रा. येरवडा, मूळ. नागपूर) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी साईट इंचार्ज विनयकुमार श्रीओमप्रकाश सिंग (वय 42) याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला उपनिरीक्षक मनीषा टूले यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वेगाने मेट्रोचे काम काज सुरू आहे. बोगदा तसेच रस्त्यावर मोठ मोठे पिलर घेऊन त्याठिकाणी काम केले जात आहे. यादरम्यान कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशनचे पिलर क्रमांक 8 चे काम सुरू असून, त्याठिकाणी मयत अभिनंदनकुमार व इतर मजूर काम करत होते.

10 मीटर उंचीचे पिलरवर बसवलेले शटरच्या नटबोल्ट काढण्याचे काम करत असताना अचानक पाय घसरून अभिनंदनकुमार रस्त्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. साईट इंचार्ज सिंग यांनी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपयोजना न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like