Worker Died : दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम कामगाराचा (Worker Died)  दुसऱ्या मजल्यावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला. संरक्षक उपकरणे न दिल्याने मजुराचा नाहक बळी गेल्याचे म्हटले आहे. ही घटना उर्से येथे घडली. 

सुखदेव राय (वय 40 वर्षे, रा. उर्से तालुका मावळ) असे दुर्देवी मृत्यू झालेल्या कामगाराचे (Worker Died)  नाव आहे. याविषयी त्यांची पत्नीने शिरगाव पोलिस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर मनोज वर्मा (रा. बावधन) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव राय वरिवाना कन्स्ट्रक्टशन साईटवर बंगला नं 358 च्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीचे सेंटरिंग काम करत होते. सदर काम संरक्षक उपकरणाअभावी धोकादायक असल्याची पुर्ण कल्पना कॉन्ट्रॅक्टर मनोज वर्मा असून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे हेल्मेट, सेफ्टी बेल्ट इत्यादी संरक्षक उपकारणे राय यांना दिली नाहीत. या बांधकामच्या साईडला शेजारच्या बांधकामासाठी खड्डा खणलेला असल्याची जाणीव असूनही कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी न बसवतात त्यांच्या राय यांना सेन्टेरिंगचे काम करण्यास सांगितले.

Uddhav Thackeray : आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

दरम्यान, सेन्टेरिंगचे काम करत असताना संरक्षक उपकरणाअभावी राय दुसऱ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळले, यात ते गंभीर जखमी झाले. जबर जखमी झाल्याने यात राय यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी विरोधात शिरगाव पोलिस चौकीत भा. द. वि कलम 304(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.