Wakad : लिफ्टच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चालू बांधकामावर लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ताथवडे येथील अॅटलांटे नावाच्या कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. याबाबत 7 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रजेन बुधीराम बोरो (वय 25) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. रंजन बुधीराम बोरो (वय 28, रा. आसाम) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोमाई कन्स्ट्रक्शनचे मालक दीपेश उकाने याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरॅमिड इन्फ्रा स्ट्रक्चरची ताथवडे येथे अॅटलांटे नावाची कन्स्ट्रक्शन साईट आहे. या साईटवर मयत प्रजेन सहाव्या मजल्यावर काम करत होता. आरोपीने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन लिफ्टच्या डक्टमध्ये सुरक्षा जाळी बसवली नाही. काम करत असताना प्रजेन सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडला. त्यातच गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.