BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू

199
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – सिमेंट काँक्रीट मिक्सरमध्ये हात घालून काम करणा-या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरने कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजी निघोजे एमआयडीसीमधील फडकेवस्ती येथे सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

कमलसिंह चंपकलाल कोरकू (वय 22, रा. फेफरी, ता. खालवा, कोरकू मोहल्ला मातपूर, खांडवा, मध्यप्रदेश) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर दयानंद बाळासाहेब चौघुले (रा. निघोजे, फडकेवस्ती, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमरसिंह चंपकलाल कोरकू (वय 19, रा. निघोजे एमआयडीसी, फडकेवस्ती, ता. खेड. मूळ रा. फेफरी, ता. खालवा, कोरकू मोहल्ला मातपूर, खांडवा, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघुले याचा सिमेंट काँक्रीट मिक्सर आहे. त्यावर अमरसिंह कामाला होता. चौघुले याने कामगारांच्या सुरक्षेबाबत योग्य काळजी घेतली नाही. 17 सप्टेंबर रोजी त्यांचे फडकेवस्ती येथे काम सुरु होते. अमरसिंह मिक्सरमध्ये हात घालून काम करत होता. पण योग्य ती खबरदारी न घेतल्याने त्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.