Bhosari : कामगारांचा भोसरीत रविवारी मेळावा

एमपीसी न्यूज – कामगारांचे प्रश्न, आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, शिवगर्जना कामगार संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यातील कामगार,  कामगार प्रतिनिधींच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

भोसरी येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात रविवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. आमदार महेश लांडगे कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. शहर भाजप कामगार आघाडीचे प्रकाश मुगडे, भाजपच्या कामगार आघाडीचे सचिव हनुमंत लांडगे, विष्णूपंत नेवाळे, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन यळवंडे, उपाध्यक्ष शाम सुळके, शिवगर्जाना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे, सल्लागार रोहीदास गाडे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष किसन बावकर, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांडगे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

हनुमंत लांडगे म्हणाले, कामगारांचे प्रश्न, आव्हाने, त्यांच्यासमोरील अडी-अडचणी  यावर मेळाव्यात चर्चा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कामगार संघटनेचे, अध्यक्ष, पदाधिकारी, भोसरीतील सर्व सभासद मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. पाच हजारहून अधिक अधिक कामगार मेळाव्याला येणार आहेत.  भोसरी मतदारसंघातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

भाजप कामगार आघाडी, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, शिवगर्जाना कामगार संघटना, महाराष्ट्र मजदूर संघटना या कामगार संघटनांनी मेळाव्याच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.