Talegaon : ‘काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे’

काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाला परंपरा व ध्येयधोरणे असून देशासाठी पक्षाचे मोठे योगदान आहे. पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी केले.

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात खळदे बोलत होते. यावेळी मतीन तांबोळी, प्रताप हुंडेकरी, ज्येष्ठ नेते पंढरीनाथ मखामले, स्वप्निल साळवे, सुदाम कांबळे, हर्षद उबाळे, विकास कुंभार, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावी, असे काम कार्यकर्त्यांनी करावे. ‘खोटे बोला पण रेटून बोला’ खोटे बोलण्याची भाजपाची ही निती फार काळ टिकणार नाही, असा टोला खळदे यांनी लगावला. पक्षाला उज्ज्वल भविष्य असून पक्ष संघटना मजबूतीसाठी कार्यकर्त्यांचे बहुमोल योगदान आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

_MPC_DIR_MPU_II

युवक अध्यक्ष विशाल वाळूंज यांनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या बरोबर राहून काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्याध्यक्ष जितेंद्र खळदे, प्रवीण पाटील, अॅड राम शहाणे, अनंत मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

तळेगाव नगरपरिषदेत विकास कामे करताना मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा नगरसेवक करत असलेल्या आरोपांबाबत यावेळी चर्चा होऊन याबाबत चौकशी होण्या संदर्भात मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना निवेदन देण्याचा निर्णय करण्यात आला आहे.

प्रास्ताविक राजीव फलके यांनी केले तर सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष अॅड राजेंद्र पोळ यांनी केले व आभार जितेंद्र खळदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.