Chakan News : कामगारांनी चोरली हॉटेल मधील एक लाख 85 हजारांची पितळी भांडी आणि शोच्या पितळी वस्तू

एमपीसी न्यूज – हॉटेल मधील एक लाख 85 हजारांची पितळेची भांडी आणि पितळेच्या शोच्या वस्तू हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी वाकी खुर्द येथील हॉटेल पंजाबी हवेली येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

मजिंदर सिंग उर्फ समीरगरी बसिगरा (रा. अमृतसर पंजाब),  शिवाजी सुपे (रा. भोरगिरी सुपेकरवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मलकीत ग्यानसिंग हुडल (वय 54, रा. बेलापूर, नवी मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे हॉटेल पंजाबी हवेली नावाचे हॉटेल आहे. आरोपी त्या हॉटेलमध्ये काम करत होते. 9 ते 18 एप्रिल या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेल मधून एक लाख 85 हजार रुपये किमतीची पितळी भांडी आणि शोच्या पितळी वस्तू चोरून नेल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.