Pimpri : अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेतर्फे मंगळवारी जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त कार्यशाळा 

एमपीसी न्यूज – जागतिक हृदय पुनर्जीवन म्हणजे बंद पडलेल्या हृदयाला दाब देऊन त्याचे कार्य कृत्रिमपणे सुरु ठेवणे. दि. 23 ऑक्टोबर – वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे या उपक्रमांतर्गत अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने संपूर्ण भारतभर कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट अर्थाक सी. पी. आर. हा अति महत्वाचा प्राथमिक उपचार सर्व सामान्य जनतेला यावा यासाठी जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित केली आहे.

मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज काळेवाडी, थिसेन कृप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पिंपरी, वढावकार कंपनी चाकण, वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी, तळेगाव जनरल हॉस्पिटल याठिकाणी शहरातील अनेक भूलतज्ज्ञ हे प्रात्यक्षिक मनुष्य सदृश बॉडीवर करुन दाखविणार आहे.

यामध्ये डॉ. माया भालेराव, डॉ. सुमित लाड, डॉ. स्मिता कुलकर्णी, डॉ. रत्नदीप मार्कंडेय, डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. सारीका लोणकर, डॉ. दीपक शिंदे, डॉ. सोनाली सावळे, डॉ. मनीषा सपाटे, डॉ. शिल्पा गुरव, डॉ. शोभा व्हटकर, डॉ. सीमा सूर्यवंशी, डॉ. स्मिता राऊत व डॉ. कुंदा डिंबले आदी भूलतज्ञ मार्गदर्शन करणार असल्याती माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.