Bhosari : इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने जागतिक स्तनपान दिन साजरा

एमपीसी न्यूज – ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा पार्श्वभूमीवर इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने जागतिक स्तनपान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांना स्तनपानाचे महत्व समजावून देण्यात आले. तसेच कामाच्या ठिकाणी स्तनपान करण्यास कोणीही अटकाव करू शकत नाही; यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

भोसरी येथील धावडे वस्तीमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी भोसरी विभाग दोनच्या मुख्य सेविका सुनंदा हांगे, इअर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ, सचिव आनंदिता मुखर्जी, शालिनी चोप्रा, राजश्री लांडगे, सुषमा रासकर आदी उपस्थित होत्या. क्लबतर्फे गर्भवती माता व स्तनदा मातांना कापडी बॅॅग, पौष्टिक लाडू, अल्पोपहार देण्यात आला. तसेच शतावरी क्लबचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

मनीषा समर्थ म्हणाल्या, जन्मलेल्या बाळाला जन्माच्या एक तासानंतर ते किमान सहा महिन्यांपर्यंत मातेचे दूध मिळणे आवश्यक आहे. पहिल्या सहा महिन्यात बाळ पूर्णतः आईच्या दुधावर तयार व्हायला हवे. जर एखादी महिला नोकरी करीत असेल तर नोकरीच्या ठिकाणी बाळाला स्तनपान करण्यापासून तिला कोणीही रोखू शकत नाही. याबाबत महिलांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान दिन म्हणून साजरा केला जातो. बाळाच्या वाढीसाठी स्तनपान अतिशय महत्वाची बाब आहे.

प्रास्ताविक सुनंदा हांगे यांनी केले. सूत्रसंचालन नंदा ओव्हाळ यांनी केले. अनिता आवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.